Ratnagiri Election Results : चिपळुणात मतमोजणीच्या 16 फेर्‍या होणार

निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांची माहिती; पाच तासांत निकाल
Election Result
Election ResultPudhari
Published on
Updated on

चिपळूण शहर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मतमोजणी प्रक्रियेची पूर्ण तयारी झाली असून, मार्कंडी येथील यु. इं. स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात मोजणी होणार आहे. मोजणीच्या कालावधीत छ. शिवाजी चौक ते बहादूरशेख हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पाच तासांच्या कालावधीत पूर्ण होऊन सायंकाळी 4.30 नंतर निकाल जाहीर केला जाईल. मतमोजणीसाठी एकूण 16 फेर्‍यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मतमोजणी प्रक्रियेविषयी माहिती देताना आकाश लिगाडे यांनी सांगितले की, सकाळी 10 वा. मतमोजणीला सुरुवात होईल. पं.स.च्या 18 गणांनुसार 18 टेबलांवर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी सुमारे 709 टपाली मतदान त्या-त्या मतदान केंद्रानुसार मोजण्याची पहिली फेरी होईल. त्यानंतर पं. स.च्या 18 गणातील मतमोजणी फेर्‍यांना सुरुवात होईल. ज्या ठिकाणी केंद्रांची संख्या कमी असेल तेथील फेर्‍या कमी होतील व ज्या ठिकाणी केंद्र जास्त असतील तेथे फेर्‍यांची संख्या जास्त असेल. एकूण 11 ते 16 फेर्‍यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. सकाळी 10 वा. मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणतः पाच तास ही प्रक्रिया चालेल. मतमोजणी प्रक्रियेअंतर्गत मेहता पेट्रोल पंप परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जागा राखीव, मार्कंडी साई मंदिर परिसर भाजप-सेनेसाठी राखीव, हॉटेल अभिषेक गल्लीमध्ये काँग्रेस व अन्य पक्ष तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षासाठी सांस्कृतिक केंद्र चौपाटी परिसर राखीव ठेवण्यात आला आहे. एकूणच उद्याची प्रक्रिया 245 केंद्रांवरील झालेल्या मतदानाच्या यंत्रातील मतमोजणीच्या फेर्‍यांनी होणार आहे.

ज्या ठिकाणी मशिन बंद पडली त्या ठिकाणच्या मतदान केंद्रातील फेर्‍यांना मतमोजणीला थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. एकूण 65 केंद्रांमध्ये बंद पडलेली मतदान यंत्र बदलण्यात आली आहेत. अशा मतदान केंद्रातील मतमोजणीला जास्त कालावधी लागणार आहे. कारण या ठिकाणी बंद पडलेली मशिन व नव्याने लावण्यात आलेली मशिनमधील मतमोजणी करावी लागणार आहे. साधारणतः 4.30 पर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news