

चिपळूण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी गावी आलेल्या कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी चिपळूण-पनवेल मार्गावर अनारक्षित मेमू विशेष रेल्वेगाडी दि. 8 फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार आहे.
01158 चिपळूण-पनवेल ही विशेष रेल्वेगाडी रविवारी दुपारी 3.25 वा. चिपळूण रेल्वे स्थानकातून सुटेल व रात्री 8.15 वा. पनवेलला पोहोचेल. ही गाडी आंजणी, खेड, कळंबणी बु., दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, साफेवामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या सर्व स्थानकांवर थांबणार आहे. मतदानासाठी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ही गाडी सोडण्यात आली असून या बाबतची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अक्षय महापदी यांनी दिली.
याचबरोबर चिपळूणहून पनवेलला पोहचलेली विशेष ट्रेन दि. 8 फेब्रुरवारी 01157 या क्रमांकाने पनवेल ते रत्नागिरी मार्गावर रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी सुटुन रत्नागिरीला ती दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता पोहचेल. या प्रवासात ही विशेष गाडी आपटा, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण,. सावर्डे, आरवली, संगमेश्वर या थांब्यावर थांबणार आहे.