

रत्नागिरी : होळी सणासाठी कोकणात येणार्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये पनवेल ते चिपळूण मार्गावर आठ डब्यांची मेमू लोकल गाडी सोडण्यात येणार आहे.
या विशेष गाड्यांबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मडगाव ते पनवेल विशेष (01102) गाडी मडगाव येथून सकाळी 8 वाजता सुटून पनवेलला संध्याकाळी 5.30 वाजता वाजता पोहचेल. ही गाडी 15 मार्च व 22 मार्च 2025 रोजी धावेल.
परतीच्या प्रवासात पनवेल - मडगाव जं. विशेष (01101) गाडी पनवेलवरून संध्याकाळी 6 वा. 20 मिनिटांनी सुटून मडगावला ती दुसर्या दिवशी सकाळी 6:45 वाजता पोहचेल. ही गाडी 15 मार्च व 22 मार्च 2025 (शनिवार) धावणार आहे.
प्रवासात ही गाडी करमाळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण थांबे घेणार आहे. या गाडीला 20 एलएचबी डबे जोडले जाणार आहेत. यात यात टू टायर 1, थ्री टियर एसी 3, थ्री टियर इकॉनॉमी 2, स्लीपर 8, जनरल 4), जनरेटर कार 1 तर एसएलआर एक असे डबे असतील.
दुसरी गाडी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणार आहे. ही विशेष गाडी (01104) मडगाव येथून संध्याकाळी 16.30 वाजता सुटून ती लो. टिळक टर्मिनसला दुसर्या दिवशी सकाळी 6.25 वाजता पोहचेल. ही गाडी 16 मार्च व 23 मार्च 2025 (रविवार) रोजी धावणार आहे.
परतीच्या प्रवासात लो. टिळक ते मडगाव विशेष (01103) गाडी लो. टिळक टर्मिनसवरून सकाळी 8:20 वाजता सुटून मडगावला ती येथे रात्री 21:40 वाजता पोहचेल. ही गाडी 17 मार्च व 24 मार्च 2025 (सोमवार) रोजी धावणार आहे.
या गाडीला करमाळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे हे थांबे आहेत. या गाडीला 20 एलएचबी डबे जोडले जाणार आहेत. यात 2 टायर 1, थ्री टियर 3, थ्री टियर इकॉनॉमी 2, स्लीपर 8, जनरल 4, जनरेटर कार 1, एसएलआय एक अशी कोच रचना असेल.
तिसरी होळी स्पेशल गाडी चिपळूण - पनवेल - चिपळूण अशी अनारक्षित मेमू विशेष गाडी असेल. चिपळूण - पनवेल अनारक्षित मेमू विशेष (01018) चिपळूण वरून दुपारी 3 वा. 25 मिनिटांनी सुटून पनवेल येथे रात्री 8 वा. 20 मिनिटांनी पोहचेल. ही मेमू गाडी 13 मार्च ते 16 मार्च 2025 या कालावधीत धावेल.
परतीच्या प्रवासात पनवेल - चिपळूण मार्गावर ही गाडी (01017) पनवेलवरून रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी सुटून चिपळूण येथे दुसर्या दिवशी पहाटे 2 वाजता पोहचेल. ही गाडी 13 मार्च ते 16 मार्च या कालावधीत धावेल. आठ डब्यांची ही गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण हे थांबे घेणार आहे.