Ratnagiri News : चिपळूण-कराड मार्ग 60 दिवस राहणार बंद

हलक्या वाहनांना पर्यायी रस्ता अवजड वाहतूक आंबा घाटाने
Chiplun Karad Road |
Chiplun Karad RoadFile Photo
Published on
Updated on

चिपळूण : कराड ते चिपळूण हा राष्ट्रीय महामार्ग दोन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पाटण येथील धांडे पुलाच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर आणि बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण हाती घेणार असल्याने तब्बल 60 दिवस चिपळूण-कराड मार्ग बंद राहाणार आहे. याबाबत 27 मार्च रोजी 12 वाजल्यापासून 27 मे रात्री 12 वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहणार असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

यासंदर्भात साताराचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी अधिसूचना जारी केली आहे. पाटण शहरातील रस्त्याच्या कामामुळे आणि पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे चिपळूण-कराड मार्ग 60 दिवस बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी वाहतुकीचे मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

कराड-उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी वाहतूक कराड-उंब्रज येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 मार्गे पाचवड, उंडाळे, कोकरूड, मलकापूर, संगमेश्वरमार्गे चिपळूणकडे येईल. चिपळूणकडून कराडकडे जाणारी अवजड वाहतूक चिपळूण, संगमेश्वर, आंबा घाटमार्गे कराडकडे येईल. हलक्या वाहनासाठी पाटण तालुक्यातून छोटा मार्ग उपलब्ध आहे. चिपळूणकडे जाणारी हलकी वाहतूक कराड व उंब्रज येथून नवा रस्ता, गव्हाणवाडी फाटा, नेरळे, गौंड मार्गे कराड, चिपळूण तर चिपळूणहून कराडकडे जाणारी छोटी वाहतूक नेरळे, गौंड, गव्हाणवाडी फाटा, नवा रस्ता मार्गे उंब्रजकडे जाईल.

एसटीला मोठा फटका बसणार...

उत्तर रत्नागिरीतून कुंभार्ली घाटमार्गे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. यामध्ये एस.टी. आणि रसायनिक कंपन्यांची अवजड वाहतूक असते. मात्र या मार्गे 60 दिवस अवजड वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, चिपळूण येथील एसटी गाड्या आंबा घाटमार्गे जाणार आहेत. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होणार आहे. याशिवाय उद्योगांना देखील फटका बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news