Chiplun crime : मालाड ते रामपूर...असा झाला खून!

चिपळूण पोलिसांच्या वेगवान तपासामुळे संशयित गजाआड
Chiplun crime News
मयत एजाज कुरेशी
Published on
Updated on

चिपळूण : तालुक्यातील रामपूर येथे जळक्या अवस्थेत सापडलेल्या सांगाड्यामागे मालाड ते रामपूर कनेक्शन असल्याचे गूढ चिपळूण पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवत उलगडले.

विशाल विजय खोडदेकर व त्याची प्रेयसी जन्नतनिसा खान या दोघांमध्ये खास मैत्री होती. जन्नतनिसा खान ही हेवी डिपॉझिट देऊन ती मालाड येथील एजाज कुरेशी याच्या घरात राहात होती. अनेक दिवस झाले तरी दिलेले 4 लाख रूपये कुरेशी परत देत नव्हता. त्यामुळे जन्नतनिसा व एजाज यांच्यामध्ये वाद सुरू होता. यामुळे विशाल याने एजाज याला मारहाण केली व त्यामध्ये एजाजचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर हे दोघेही घाबरले. यानंतर विशाल, जन्नतनिसा आणि तिचा 17 वर्षांचा मुलगा या तिघांनी त्याचा मृतदेह बॅगेत भरून गाडीतून रामपूर येथे आणला व आवटेवाडी येथील बागेलगतच्या दरीमध्ये फेकून दिला. नोव्हेंबरमध्ये हा मृतदेह फेकण्यात आला. यानंतर फेब्रुवारीमध्ये विशाल हा रामपूरमध्ये आला व त्याने मृतदेह फेकलेल्या ठिकाणी जावून डिझेल ओतून पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह जाळला. जळलेल्या अवस्थेतील हाडांवरून या खुनाचा तपास उलगडला.

पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर विशाल याने आपण खून केल्याची कबुली दिली. या खून प्रकरणी विशाल खोडदेकर व त्याची मैत्रिण जन्नतनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना चिपळूण येथील न्यायालयाने 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news