Chiplun Murder Case | चिपळूणमधील कार व्यावसायिक खून

Sangameshwar Arrest | प्रकरणात संगमेश्वरमधून दोघांना अटक
Chiplun Murder Case
चिपळूणमधील कार व्यावसायिक खून (File Photo)
Published on
Updated on

देवरुख : चिपळुणातील सती येथील कार व्यावसायिक सुनील दादा हसे (54, मूळ रा. अंबड-अकोले, अहिल्यानगर) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी मोहन पांडुरंग सोनार (54), अक्षय सचिन जाधव (22, दोघेही रा. बोरसूत-संगमेश्वर) व वंदना दादासाहेब पुणेकर (36, रा. जयसिंगपूर, कोल्हापूर) या तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे.

पैशाच्या हव्यासापोटी हा खून केल्याची कबुली या तिघांनी दिली. 27 एप्रिल रोजी पहाटे सुनील हसे यांना गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर कारमध्येच ओढणीने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. खूनानंतर मृतदेह मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील कशेडी घाट रस्त्यालगत फेकून देत ते पसार झाले होते.

खुनानंतर 30 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मृतदेह घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. भोगाव-पोलादपूरच्या पोलिसपाटील शुभांगी उतेकर यांनी पोलादपूर पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक आनंद रावडे आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

Chiplun Murder Case
Ratnagiri : गुहागर वरचापाटला समुद्री उधाणाचा फटका

याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 4 दिवसातच अक्षय जाधव याच्या मुसक्या आवळल्यानंतर खून प्रकरणाचा छडा लागला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलादपूर पोलिसांसमोर असतानाच तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अखेर ओळख पटवत पोलिसांनी तपासाला गती दिली गेली.

Chiplun Murder Case
Devrukh | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला अटक

अक्षय जाधव याच्याकडून पोलिसांच्या हाती धागेदेरे लागल्यानंतर मृतदेह फेकून पसार झालेल्या अन्य दोन संशयितांच्या मागावर पोलादपूर पोलिस होते. दोन्ही संशयित आपली ओळख लपवत कर्नाटक- सीमावर्ती भागात लपून सलग दोन महिने पोलादपूर पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर दोघांनाही पकडत पोलिसांना या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news