रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर कुवे येथे कार वहाळात कोसळली

पाच प्रवासी अपघातातून थोडक्यात बचावले
Mumbai-Goa highway accident
कार वहाळात कोसळली
Published on
Updated on

लांजा : गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारी क्रेटा कार 15 फूट खोल वहाळात कोसळून अपघात झाला. कारमधून प्रवास करणारेे सर्व पाच प्रवासी हे थोडक्यात बचावले. ही घटना सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुवे खत कारखान्यानजीक घडली.

Mumbai-Goa highway accident
रत्नागिरी : जनावरांच्या ‘रात्रीच्या खेळा’मुळे शेतकरी चिंताग्रस्त!

मुंबई-गोवा महामार्गाचे लांजा ते वाकेड दरम्यान काम सुरू असून काही या भागात ठिकाणी पर्यायी रस्ते तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी मोठे खड्डे असून बारीक खडी टाकल्याने वाहन चालकांना लगेच रस्त्याचा अंदाज येत नाही. याचाच फटका गोव्यातून ते मुंबईकडे जाणार्‍या एका कारला सोमवारी बसला. चालकाला अंदाज न आल्याने कार घसरून मोठ्या वहाळात जाऊन धडकली. या अपघातात कारमधील कोणालाही इजा झाली नाही. मात्र, कारचे किरकोळ नुकसान झाले. महामार्गावरून जाणार्‍या इतर वाहनचालकांनी व शेजारील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन गाडीतील प्रवाशांना मदत केली.

Mumbai-Goa highway accident
रत्नागिरी : मडगाव-पनवेल विशेष रेल्वे वैभववाडीत रोखली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news