

रत्नागिरी : रायगडमध्ये खोपोलीनजीक कुरवले फाटा येथे कार उलटून झालेल्या अपघातात लांजा तालुक्यातील महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुधवार, दि. 2 एप्रिल रोजी मध्यरात्री 2.30 वा. सुमारास घडली होती.
सलोनी दिनेश खाके (28, रा. कसोपसडा मूळ रा. कुर्णे खाकेवाडी, लांजा) असे अपघातातील मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सलोनी खाके या पती दिनेश खाके यांच्यासोबत 1 एप्रिल रोजी कारने ठाणे येथे कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. 2 एप्रिल रोजी त्या रत्नागिरीला परत येत असताना मध्यरात्री 2.30 वा. सुमारास पाली-खोपोली रस्त्यावरील कुरवले फाटा येथे त्यांच्या कारसमोर म्हैस आडवी आल्याने त्यांच्या कारचा अपघात झाला.