अर्थसंकल्पात बंदरे व मत्स्य विकासासाठी 724 कोटींची तरतूद

बंदरे विकासासाठी 484 कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी 240 कोटी
Budget provides Rs 724 crore for ports and fisheries development
मंत्री नीतेश राणे Pudhari File Photo
Published on
Updated on

कणकवली : निर्णय क्षमता आणि कामाचा उरक असलेल्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने फार मोठी तरतूद करून दिली आहे. बंदरे विकासासाठी 484 कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी 240 कोटींची तरतूद केली आहे. दोन्ही खात्यांचे मिळून 724 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

या दोन्ही खात्यांची अर्थसंकल्पातील आतापर्यंतची ही सर्वात जास्त तरतूद आहे. बंदरे आणि मत्स्य व्यवसाय खात्याला प्रथमच एवढी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय वाढीसाठी तसेच बंदर विकासासाठी मंत्री नीतेश राणे यांनी गेल्या शंभर दिवसांच्या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या त्यांच्या कामाची दखल घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव तरतूद करण्यासंदर्भात निर्णय घेतला आणि तशा पद्धतीने अर्थसंकल्पात तो दिसून आला. बंदरे विकासासाठी 484 कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी 240 कोटी असे मिळून 724 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात अनेक कामाचा समावेश होणार आहे. बंदर विकासाबरोबरच मच्छीमारांचे प्रश्नसुद्धा या माध्यमातून सूचना आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news