

देवरुख : नजीकच्या मौजे-पाटगाव येथील देवरुख-रत्नागिरी रस्त्याच्या बाजूला दुर्मिळ काळा बिबट्या रविवारी (दि.१७) निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पाटगाव येथील ग्रामस्थांनी यांची माहिती वनपाल संगमेश्वर देवरुख यांना दिली. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर वनविभागाने देवरुख येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ. युवराज शेट्ये यांना यांना घटनास्थळी बोलावून घेतले. शेट्ये यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून अनेक दिवस उपासमार झाल्याने बिबट्याला आशक्तपणा आल्याची माहिती वनविभागाला दिली. बिबट्यावर त्यानंतर या डॉ. संतोष वाळवेकर, वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी कोल्हापूर वनविभाग, डॉ निखिल बनगर वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी सातारा वनविभाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्प श्री कुंभार पशुपर्यवेक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली या बिबट्यावर त्यानंतर कोल्हापूर वनविभागाचे वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर, सातारा वनविभागाचे डॉ. निखिल बनगर आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पशुपर्यवेक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. हा बिबट्या नर असून त्याचे अंदाजे वय एक वर्षे आहे. उपचारासाठी या बिबट्याला सातारा वनविभागातील टी. टी. सेंटर सातारा येथे पाठविण्यात आले.