Bike Truck accident | दुचाकीला ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, मुलगी जखमी

फुरुस येथील संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Bike Truck accident
Bike Truck accident | दुचाकीला ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, मुलगी जखमी File Photo
Published on
Updated on

खेड : खेड-दापोली मार्गावर फुरूस गावाजवळ गुरुवारी 19 मार्च रोजी रात्री 8 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली मुलगी जखमी झाली आहे. सचिन गणू खामकर (रा. फुरूस, चौगुलेवाडी) असे मृताचे नाव आहे. जखमी मुलीचे नाव समजू शकले नाही.

या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून जात असताना समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या धडकेत दुचाकीस्वार सचिन खामकर यांचा जागीच मृत्यू झाला. याच अपघातात जखमी झालेल्या मुलीला तत्काळ फुरूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ खेड - दापोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला वातावरण तणावपूर्ण बनले होते; मात्र पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. काही वेळानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अशा अपघातांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news