Bhuibawada Ghat | भुईबावडा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

शनिवारी रात्री साडेनऊची घटना, दरड हटविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
Bhuibawada Ghat | भुईबावडा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प
Published on
Updated on

वैभववाडी : भुईबावडा घाटात शनिवारी रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आल्याने खारेपाटण–गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

तालुक्यात आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता.घाट क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला.याचा फटका भुईबावडा घाट मार्गाला बसला आहे.घाटात रात्री ९.३०च्या दरम्यान दरड कोसळली.माती व दगडाने रस्त्याचा पुर्ण भाग व्यापला आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.काही वाहने घाटात अडकली आहेत. संबधित विभागाकडून दरड हटविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news