

रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील सायली बारमध्ये भक्ती मयेकरच्या खून प्रकरणात संशयित मुख्य आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी चौकशी ताब्यात घेतले.
लग्नासाठी तगादा लावणार्या भक्ती मयेकर (26, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी, रत्नागिरी) हिचा? ? दुर्वास पाटीलला काटा काढायचा होता. त्यासाठी त्यानेे तिला वाटद-खंडाळा येथील आपल्या सायली बारमध्ये तिला बोलावून घेतले होते. 16 ऑगस्ट रोजी भक्ती त्याठिकाणी गेली असता दुर्वास पाटीलने विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या दोघांच्या मदतीने भक्तीचा बारच्या वरच्या मजल्यावर वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर सुशांत नरळकरने आपल्या कारमधून भक्तीचा मृतदेह आंबा घाटात नेउन फेकला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी दुर्वास पाटीलचे वडील दर्शन पाटील यांना चौकशीसाठी शहर पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. या चौकशीतून काही गोष्टींची उकल होण्याची शक्यता असून सध्या सायली बारला उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आले आहे.