Ratnagiri : खुनातील आरोपी दुर्वास पाटीलला वडिलांच्या अंत्यसंस्कारास परवानगी

दर्शन पाटील हा वीर खून प्रकरणातील होता संशयित
Ratnagiri Crime News
Ratnagiri : खुनातील आरोपी दुर्वास पाटीलला वडिलांच्या अंत्यसंस्कारास परवानगी
Published on
Updated on

रत्नागिरी ः भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटील याला न्यायालयाने त्याचे वडील दर्शन पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची बुधवारी मुभा दिली.

दर्शन पाटील हा वीर खून प्रकरणातील संशयित होता. न्यायालयीन कोठडीत असताना त्याची प्रकृती बिघडल्याने अधिक उपचारांसाठी त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी न्यायालयाने मुलगा दुर्वास पाटीलला बुधवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीसाठी पोलिस कस्टडीतच उपस्थित राहण्याची मुभा दिली. संशयित दुर्वास पाटीलच्या वकिलांनी न्यायालयात दर्शन पाटीलच्या विधीसाठी न्यायालयात 15 दिवसांच्या जामिनाची मागणी केली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत सुनावणी सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news