Ahmedabad plane crash : चिपळूणच्या धामेली गावातील अपर्णा महाडिक यांचे आकाशातले ठरले शेवटचे उड्डाण

गुजरात विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू
Ahmedabad plane crash
अपर्णा महाडिकpudhari photo
Published on
Updated on

Aparna Mahadik plane crash

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुनबाई आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (वय ३५) यांचे गुरुवारी गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे.

Ahmedabad plane crash
Ahmedabad Plane Crash : टाटा ग्रुपचा मोठा निर्णय, विमान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत जाहीर

अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत. गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होत्या. गुरुवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना, तांत्रिक बिघाडामुळे विमान अपघात घडला आणि या दुर्घटनेत अपर्णा यांना प्राण गमवावे लागले.

त्यांचे पती अमोल महाडिक हेही एअर इंडिया सेवेत कार्यरत आहेत. अपर्णा यांच्या अपघाती निधनाची माहिती समजताच त्यांच्या कुटुंबियांमध्ये, नातेवाईकांत आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. विनम्र, समजूतदार आणि व्यावसायिकतेची ओळख असलेली ही धडाडीची महिला अचानक हरपल्याने संपूर्ण कोकण हळहळला आहे.

धामेली गावातही या बातमीने शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीची माहिती नातेवाईकांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

या दुर्दैवी घटनेवर अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी अपर्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले, “अपर्णा महाडिक यांच्या अपघाती निधनाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांनी एक जबाबदार, कर्तबगार महिला गमावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news