कोकण रेल्वे मार्गे आणखी एक महाकुंभ विशेष ट्रेन धावणार

मडगाव नंतर रत्नागिरी, चिपळूण तसेच रोह्याला थांबणार
Another Mahakumbh special train to run via Konkan Railway
कोकण रेल्वे मार्गे आणखी एक महाकुंभ विशेष ट्रेन धावणारPudhari File Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणार्‍या भाविकांसाठी गोवा सरकारने त्यांच्या राज्यातील भाविकांसाठी तीन विशेष गाड्यांची घोषणा केल्यानंतर आता कर्नाटकमधून उडपी स्थानकावरून प्रयागराजसाठी 17 फेब्रुवारीला गाडी सुटणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावताना मडगावनंतर ही गाडी रत्नागिरी, चिपळूण तसेच रोहा स्थानके घेत कल्याण, नाशिकमार्गे प्रयागराजला रवाना होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला एकही थांबा दिला न गेल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या खासदारांनी या संदर्भात आधीच रेल्वेकडे पत्रव्यवहार करूनही रेल्वेने सिंधुदुर्गबाबत दुजाभाव दाखवला आहे. काही दिवसांपूर्वीच गोवा सरकारने त्यांच्या राज्यातील भाविकांसाठी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यासाठी तीन गाड्यांची घोषणा केली. मात्र, या गाड्या एफटीआर स्पेशल गाड्या असल्याने केवळ गोवा राज्यातील तीन स्थानकांवर प्रवाशांना घेऊन परत आणण्यासाठी या गाड्यांचे विशेष नियोजन गोवा सरकारने केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा देखील लागतो, याचा विसर....

दरम्यान, शुक्रवारी नव्याने जाहीर झालेली कर्नाटकमधील उडुपी ते प्रयागराजसाठी 01192/01191 दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी सुटणारी गाडीही फक्त कर्नाटक राज्यातील भाविकांसाठी नसली तरी गोव्यानंतर ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर केवळ रत्नागिरी, चिपळूण आणि रोहा हे तीनच थांबे घेणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा देखील लागतो, याचा कोकण रेल्वेला विसर पडला आहे.

या स्थानकांवर थांबे

ही गाडी उडुपीतून सुटल्यानंतर बारकूर, कुंदापुरा, मूकांबिका रोड, बिंदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपारिया, मदन महल, कटनी, सत्ना, माणिकपूर, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news