गद्दारांना धडा शिकविण्याची संधी : डॉ. अमोल कोल्हे

Maharashtra assembly poll | प्रशांत यादव यांच्या प्रचारसभेत घणाघात
Amol Kolhe political speech
चिपळूण : येथे प्रचारसभेसाठी आलेले राष्ट्रवादीचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वागत करताना आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव, सुभाष बने, रवींद्र माने, सुरेश बने, रोहन बने, राजू महाडिक व पदाधिकारी.pudharii photo
Published on: 
Updated on: 

चिपळूण शहर : महाराष्ट्राला साडेतीनशे वर्षांपूर्वी लागलेली गद्दारीची जखम अजूनही भळभळ वाहत आहे. ज्या भूमीत वतनाशी बेईमानी करणार्‍यांनी गद्दारी करून छत्रपती संभाजी महाराजांचा घात केला, त्याच भूमीत पुन्हा गद्दारी झाली आहे, असे सांगत आता या निवडणुकीत गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवून भगवा नाचविण्याची संधी आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारसभेत ते शनिवारी (दि. 16) सकाळी चिपळूण येथे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आ. रमेश कदम, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आ. सुभाष बने, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, बाळा कदम, लियाकत शाह, प्रताप शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी खा. डॉ. कोल्हे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने चिपळूण येथे आलो होतो. त्यावेळी हातात भगवा घेऊन चौकात अनेकजण नाचले. मात्र, हातात भगवा घेऊन विरोध करण्याची हिंमत ज्यांच्या पायात नव्हती, अशांना आपण ताकद दिल्याचे ते म्हणाले.(Maharashtra assembly poll)

ठाकरे व पवारांचा माझ्या डोक्यावर हात : यादव

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव म्हणाले की, निवडणुकीत आम्ही समंजसपणे आणि शांतपणे उतरलेले आहोत. आता पराभव समोर दिसू लागल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. ते आमच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. मात्र, विरोधकांनी लक्षात ठेवावे की, महाविकास आघाडीतील शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा हात माझ्या डोक्यावर आहे. त्यामुळे शांतता सोडायला आम्हाला भाग पाडू नका. जे तुम्ही पाच वर्षांत केले त्या मुद्द्यांवर निवडणूक लढवा. आता आमची ताकद वाढली आहे, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news