Amba Ghat robbery : आंबा घाटात गाडी अडवून लूटमार

पाच दरोडेखोरांना दोन तासांतच जेरबंद करण्यात देवरुख पोलिसांना यश
Amba Ghat robbery
आंबा घाटात गाडी अडवून लूटमार
Published on
Updated on

देवरुख : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर म्हैस घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीचा पाठलाग करून आठ दरोडेखोरांनी बोलेरो चालकाला अडवून हत्याराचा धाक दाखवत गाडीतील 25 हजार रुपये काढून घेतले. यातील पाच दरोडेखोरांना दोन तासांतच पकडण्यात देवरूख पोलिसांना यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहूवाडी, कोल्हापूर) हे 8 एप्रिल रोजी बोलेरो गाडीमध्ये वेतोशी (ता. रत्नागिरी) येथून सायंकाळी 6.30 च्या सुमारास एक म्हैस भरून शिराळा-सांगली येथे घेऊन जात होते. ते आंबाघाट दख्खन येथे आले असता थार गाडी क्रमांक एम.एच.08/2767 व भारत सरकार असा स्टिकर असलेली इनोव्हा गाडी क्रमांक एम.एच.08/2099 मध्ये आलेल्या आठ अनोळखी व्यक्तींनी दळवी यांच्या गाडीच्या पुढे व मागे लावून फिर्यादीला गाडीतून खाली उतरवून मारहाण करत शिवीगाळ केली.

याबाबत फिर्यादी प्रथमेश दळवी यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम व देवरूख पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी तपास पथके तयार करून गुन्ह्यातील 8 दरोडेखोरांपैकी 5 आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news