Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची गणपतीपुळेला भेट, स्वयंभू श्रींचे कुटुंबीयांसमवेत घेतले दर्शन

मंदिर कर्मचाऱ्यांसोबत साधला संवाद
Ajinkya Rahane
अजिंक्य रहाणेची गणपतीपुळेला भेट, स्वयंभू श्रींचे कुटुंबीयांसमवेत घेतले दर्शन
Published on
Updated on

गणपतीपुळे : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने मंगळवारी (दि. 27) भेट देत स्वयंभू श्रींचे कुटुंबीयांसमवेत दर्शन घेतले. या भेटीत रहाणे याचा संस्थान श्री देव गणपतीपुळे पंच कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान व उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आले.

यावेळी रहाणे याने गणपतीपुळे मंदिरातील पुजारी देवस्थानचे पंच, पुजारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तसेच, रहाणे याची भेट होताच गणपती मंदिरात उपस्थित असलेल्या भाविक व पर्यटकांनी आणि देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासमवेत छायाचित्रे घेतली. या भेटीत रहाणे याने गणपतीपुळे देवस्थानच्या विविध सामाजिक उपक्रमांचे आणि भाविकांना देण्यात येणाऱ्या चांगल्या सोयीसुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news