

चिपळूण : चिपळूणच्या पाणथळ परिसरात नुकताच एक अद्वितीय पक्षी दिसून आला आहे . पक्षी निरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या नजरेतून दोन काळ्या बगळ्यांचा ब्लॅक हेरॉन (Black Heron - Egretta ardesiaca) हा अत्यंत दुर्मीळ आणि भारतात आजवर न दिसलेला पक्षी प्रथमच आढळून आल्याची नोंद झाली आहे. हा पक्षी आफ्रिकेतून आला असून, त्याचे स्थलांतर पक्षी अभ्यासकांच्या द़ृष्टीने ऐतिहासिक मानले जात आहे.
डॉ. जोशी यांना रविवारी (दि. 3 ऑगस्ट) सकाळी एका पाणथळ जागी दोन काळे बगळे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मासे पकडताना दिसले. त्यांनी त्वरित कॅमेर्यात हे क्षण टिपले आणि घरी आल्यावर त्याचा सखोल अभ्यास केला. त्यावेळी जगात लरपेिू षशशवळपस किंवा र्ीालीशश्रश्रर षशशवळपस ही अनोखी मासे पकडण्याची शैली केवळ ब्लॅक हेरॉन या आफ्रिकन पक्षातच दिसून येते असे आढळले. हा पक्षी आपले पंख अर्धवर्तुळात पसरण्याची ही अनोखी युक्ती करुन माशांना सावलीखाली आकर्षित करतो आणि त्यांना सहज पकडतोे.
सुरुवातीला हा रातबगळा (इश्ररलज्ञ-लीेुपशव छळसहीं कशीेप) असल्याचा अंदाज काही निरीक्षकांनी व्यक्त केला. मात्र लांब पाय, संपूर्ण काळे शरीर आणि ‘कॅनोपी फिडींग’ची खास शैली या वैशिष्ट्यांवरून सर्वांचे एकमत झाले की, तो पक्षी म्हणजेच ब्लॅक हेरॉनच आहे. ही माहिती व छायाचित्रे डॉ. जोशी यांनी ‘इंडियन बर्ड जर्नल’कडे पाठवली असून भारतात या पक्ष्याची ही पहिलीच अधिकृत नोंद असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.
ब्लॅक हेरॉन हा मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारा निवासी पक्षी आहे. सेनेगल, सुडान, केनिया, तंजानिया, मोजांबिक आणि मॅडगास्कर हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत. युरोपातही काही अपवादात्मक नोंदी (ग्रीस, इटली, डब्लिन) आहेत. मात्र भारतात आजवर या पक्ष्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नव्हता. हा पक्षी स्थलांतर करत नाही. केवळ अन्नपाण्याची कमतरता असल्यास तो परिसर बदलतो. त्यामुळे त्याच्या चिपळूणमध्ये अचानक झालेल्या आगमनाने आश्चर्य व्यक्त होत आहे.