Khed PS Election | खेड पं. स. च्या सभापतीपदी आफिया पालेकर, उपसभापतीपदी सुनील मोरे

Khed Ratnagiri Politics | उपविभागीय अधिकारी तथा पीठासन अधिकारी वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची सभा
Afia Palekar Chairperson
चायत समिती सभापती पदी निवड झाल्यानंतर अफिया पालेकर यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम. Pudhari
Published on
Updated on

Afia Palekar Chairperson Khed Panchayat Samiti

खेड : खेड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड सोमवारी (दि. ९) उपविभागीय अधिकारी तथा पीठासन अधिकारी वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या आफिया पालेकर यांची सभापतीपदी, तर सुनील मोरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

खेड पंचायत समितीत शिवसेनेचे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतीपदासाठी अंजनी गणातून निवडून आलेल्या आफिया पालेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे मुस्लिम समाजाला पुन्हा एकदा पंचायत समितीच्या नेतृत्वात प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे. यापूर्वीही या समाजातील सदस्याला सभापतीपदाची संधी मिळाली होती.

Afia Palekar Chairperson
Rajapur PS Election| राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी नंदिनी कदम, उपसभापतीपदी अभिजीत गुरव बिनविरोध

उपसभापती पदासाठी गुणदे गणातून निवडून आलेले सुनील मोरे यांच्या नावाची सुरुवातीपासूनच चर्चा होती. अखेर सर्वांच्या एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांची उपसभापतीपदी निवड निश्चित झाली.

खेड पंचायत समितीत शिवसेनेचे १०, ठाकरे गटाचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा १ सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे सभापतीपद शिवसेनेकडे जाणार हे पूर्वीपासूनच स्पष्ट झाले होते. शिवसेना नेते रामदास कदम तसेच गृहमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडल्याचे सांगितले जाते.

Afia Palekar Chairperson
Ratnagiri Crime | शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; भाटिमिऱ्या येथील एकजण गंभीर जखमी

दरम्यान, आफिया पालेकर यांच्या निवडीमुळे मुस्लिम समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पंचायत समितीच्या कारभारात सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडीनंतर जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, उद्योजक शैलेश कदम, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, दिलीप डेरवनकर, निसार सुर्वे, शमिका म्हादे, प्रशांत चव्हाण, नम्रता तांबट, महेंद्र भोसले, सुनीता कासार आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांची रथातून खेड शहरात सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news