प्रशासनाने फिरवली खरवतेतील दिव्यांग मेळाव्याकडे पाठ

परिवहन महामंडळाचे डेपो मॅनेजर चव्हाण वगळता कुणीही या मेळाव्याकडे फिरकले नाही
Government Apathy
चिपळूण : दिव्यांंग मेळाव्यास उपस्थित माजी सभापती पूजा निकम. सोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे व अन्य मान्यवर.pudhari photo
Published on
Updated on

चिपळूण : आमदार शेखर गोविंदराव निकम व दिव्यांग समन्वय समिती चिपळूण आयोजित दिव्यांग आनंद मेळावा कृषी महाविद्यालय खरवते येथे आ. निकम यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. आमदारांनी स्वतः, दिव्यांग योजना संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना या मेळाव्यानिमित्त दिव्यांगांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे डेपो मॅनेजर चव्हाण वगळता कुणीही या मेळाव्याकडे फिरकले नाही.

आमदारांनी दिव्यांगांना आनंद मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. सकाळचा चहा, नाष्टा देऊन, दिव्यांगांचे स्वागत करण्यात आले. दिव्यांगांच्या विविध योजनांबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. सिद्धिविनायक ट्रस्टच्या मनीषा तुपे यांनी दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दिव्यांग, घरबसल्या, कृषीविषयक क्षेत्रात स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन कसे निर्माण करू शकतो. प्रसंगी दिव्यांगांनी निर्मिती केलेल्या रोपांचे मार्केटिंग, कृषी महाविद्यालय करेल असा दिव्यांगांना विश्वास देण्यात आला. रविवार असल्याने दुपारचे शाकाहारी/मांसाहारी स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

दुपारच्या सत्रात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रम बघण्यात दिव्यांग इतके रममाण झाले की, कार्यक्रम संपूच नये, असा भाव दिव्यांगांच्या चेहर्‍यावर दिसत होता. पंचायत समिती, माजी सभापती पुजाताई निकम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सायंकाळी दिव्यांग आनंदाने तृप्त होऊन आपल्या घरी परतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news