Aai Women Tourism | कोकणातील महिलांसाठी 'आई' पर्यटन धोरण वरदान; 15 लाखांपर्यंतच्या कर्जावर मिळणार व्याज सवलत

Aai Women Tourism | कोकणातील निसर्गसंपदा, समुद्रकिनारे, ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यसंस्कृतीला पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक बळ देण्याची क्षमता आहे.
Women Tourism
Women Tourism
Published on: 
Updated on: 
Summary
  • महिला उद्योजिकांना १५ लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज सवलत

  • होम स्टे, कृषी पर्यटन, हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्ससह विविध व्यवसायांना प्रोत्साहन

  • कोकणातील पर्यटन व्यवसायांना नवी संधी; स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
कोकणातील निसर्गसंपदा, समुद्रकिनारे, ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यसंस्कृतीला पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक बळ देण्याची क्षमता आहे. मात्र, या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी अनेक महिलांना भांडवलाची अडचण जाणवते. ही अडचण दूर करून महिलांना पर्यटन उद्योजेकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने 'आई' महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवले आहे.

Women Tourism
Ratnagiri ST Division | दिवाळीनिमित्त रत्नागिरी एसटी विभागाकडून तब्बल साडेतीनशे 'लालपरी' सोडण्याचे विशेष नियोजन

या योजनेंतर्गत पात्र महिला उद्योजिकांना १५ लाख रुपयांपर्यंतच्या बँक कर्जावरील व्याजाची प्रतिपूर्ती मिळू शकते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्या महिलांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.
'आई' धोरणाच्या माध्यमातून महिलांना केवळ पारंपरिक व्यवसायांपुरता मर्यादित न ठेवता पर्यटनदेशी संबंधित विविध क्षेत्रांत उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. होम स्टे, हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, कृषी पर्यटन केंद्र, टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी, पर्यटकांसाठी वाहतूक सुविधा, सहल मार्गदर्शन, हस्तकला विक्री, स्थानिक खाद्यपदार्थ आणि साहसी पर्यटनाशी संबंधित व्यवसायांचा यामध्ये समावेश होऊ शकतो.

रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, आरे-वारे, गुहागर, दापोली, राजापूर आणि अन्य पर्यटनस्थळांच्या परिसरात स्थानिक वैशिष्ट्यांवर आधारित व्यवसाय उभारण्याची क्षमता आहे. घरातील उपलब्ध जागेत पर्यटकांसाठी निवासाची सुविधा, कोकणी पद्धतीचे जेवण, स्थानिक उत्पादनांची विक्री किंवा गावातील पर्यटनस्थळांची माहिती देणारी सेवा सुरू करून महिलांना उत्पन्नाचे साधन निर्माण करता येऊ शकते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पर्यटन व्यवसायाची पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी असणे आणि व्यवसाय महिलेच्या मालकीचा व तिच्याद्वारे चालवला जाणारा असणे आवश्यक आहे. व्यवसायासाठी आवश्यक परवान्यांसह इतर अटींची पूर्तता करावी लागते. हॉटेल, रेस्टॉरंट आणि ट्रॅव्हल्स व्यवसायांसाठी महिलांच्या मालकीसह कर्मचारी व व्यवस्थापनातील महिलांच्या सहभागाबाबत स्वतंत्र निकष लागू आहेत.

Women Tourism
Ratnagiri Water Scarcit | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यातच पाणीटंचाईचे भीषण चटके; 183 गावांवर संकटाचे सावट

कर्जावरील व्याजाची प्रतिपूर्ती

या योजनेत पात्र महिला उद्योजिकांना मान्यताप्राप्त बँकांकडून घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाची प्रतिपूर्ती करण्याची तरतूद आहे. व्याज प्रतिपूर्तीची मर्यादा वार्षिक १२ टक्के किंवा कमाल ४.५ लाख रुपये असून, ही मदत कर्जाची परतफेड पूर्ण होईपर्यंत किंवा सात वर्षांपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत, लागू अटींनुसार मिळू शकते. पात्र लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाती.

स्थानिक अर्थव्यवस्थेस बळ

पर्यटन व्यवसाय वाढल्यास केवळ उद्योजिकांनाच उत्पन्न मिळणार नाही, तर स्थानिक महिला बचत गट, शेतकरी, मच्छीमार, हस्तकलाकार, वाहनचालक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पर्यटकांना स्थानिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव देणारे उपक्रम विकसित झाल्यास पर्यटनाचा लाभ मोठ्या हॉटेलपुरता मर्यादित न राहता गावतळीपर्यंत पोहोचू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news