.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
राजापूर : अनुस्कुरा घाटात शुक्रवारी मध्यरात्री दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक बंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घाटातील दरड हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याचा प्रकार घडला आहे.