

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे खरीप हंगामातील भात, नाचणी यासह विविध पिकासहीत तब्ब्ल 198.5 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार केल्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसान भरपाईसाठी 988 शेतकरी पात्र झाले असून लवकरच या शेतकर्यांच्या खात्यावर 68 लाख 61 हजार 145 इतकी रक्कम कंपनीकडून जमा होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 2024-25 सालाी झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे भात, नाचणीसह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीपासून शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे ज्या शेतकर्यांनी आपल्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे ई पीक पाहणीत नोंद केली आहे. अशा शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून जिल्ह्यातील शेतकर्यांचे पात्र, अपात्र यादी करण्यात आली असून तब्बल 988 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत.नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक आहे. ओळख क्रमांक नसल्यास रक्कम मिळणार नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात ज्या शेतकर्यांचे खरीप हंगाम भात, नाचणी रब्बी हंगाम, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग अशा पिके घेणार आहेत. पीक विमा मिळण्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. 31 जुलैपर्यंत शेतकर्यांनी प्रधानमंत्री पीक विमासाठी अर्ज करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणार्या इतरबाबींमुळे पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणार्या इतर हंगामच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे, तांत्रिक उत्पादन आधारे, महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देण्यात येईल.