रत्नागिरी : पाचेरीत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या वाहनाचा अपघात; दोघांचा मृत्यू तर पाच जखमी | पुढारी

रत्नागिरी : पाचेरीत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या वाहनाचा अपघात; दोघांचा मृत्यू तर पाच जखमी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पाचेरी येथे गणपती विसर्जनासाठी निघालेल्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत.

पाचेरी आगर येथील भुवडवाडीतील गणपती विसर्जनासाठी जात असलेल्या वाहनाचा पाचेरी येथे अपघात झाला. गाडी ब्रेक फेल झाल्याने वाहन थेट गणपती मिरवणुकीत घुसले. दीपक भुवड (वय 50) व कोमल भुवड (वय १७) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातात दोन मुली व तीन महिला जखमी असून अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Back to top button