Ratnagiri Dog Attack : लांजा शहरात भटक्‍या कुत्र्यांच्‍या हल्‍ल्‍यात ४ वर्षीय बालिका जखमी

सर्द्दळवाडी येथील घटना
Dog Attack
Dog AttackPudhari
Published on
Updated on

लांजा : शहरातील सर्द्दळवाडी येथे सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडली.

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्‍या बालिकेचे नाव स्वम्भवी समीर तानवडे (वय वर्ष ४, रा. लांजा सार्द्दळवाडी) असे आहे. स्वम्भवी ही रस्त्याने शेजारच्या घरी जात असताना सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. तिने आरडाओरडा करताच पालकांनी व शेजारच्या नागरिकांनी धाव घेतली व स्वम्भवी हिला कुत्रांपासून बाजूला केले. जखमी स्वम्भवी हिला तत्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news