

कडवई : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तुरळ फाटा येथे ट्रॅव्हल्स बस आणि डंपरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल मधील 21 प्रवाशांना किरकोळ मार लागला असून, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. डंपर चालक चालू गाडी सोडून पळून गेला. हा अपघात रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला
कोपरखैरणे येथून गणपतीपुळे येथे आलेले भक्तगण पुन्हा कोपरखैरणे येथे परतीच्या मार्गांवर जात असताना त्यांची ट्रॅव्हल बस एम. एच. 43 सीई 4293 ही मुंबई -गोवा महामार्गांवरून जात असताना संगमेश्वर तालुक्यात येणार्या तुरळ फाटा येथे आली असता त्या ट्रॅव्हल बसच्या पुढे असलेच्या एम. एच. 12 डब्ल्यू जे. 4751) या डंपर चालकाने त्याला उजव्या बाजूला जायचे आहे. हे साईड इंडिकेटरने न दर्शवता अचानक गाडी उजव्या बाजूला वळवल्याने ट्रॅव्हल बस डंपरच्या मागे जाऊन जोरात धडकली.
डंपरला ट्रॅव्हल बसची धडक जोरात बसल्याने ट्रॅव्हल बसच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.असून ट्रॅव्हल चालकासह 21 प्रवाशांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. अपघातातील जखमींमध्ये स्वरा महेश आगरकर (वय 11), नंदा प्रदीप पाटील (43), किंजल उमेश आगरकर (23), उमेश गोपीनाथ आगरकर वय 46,सिमरन उमेश आगरकर (17), हेमा उमेश आगरकर (43),आकांक्षा आकाश पाटील वय 19,मोना वासुदेव साळवी (52), कुणाल महेश आगरकर वय 22,आयुष्य बाळूनाथ पाटील (24), किंजल संदीप घरत (14), विनोद रामदास नाईक (47), रंजना गोवर्धन साळवी (54), प्रियंका प्रदीप घरत वय 35,राजेश गोकुळ पाटील (51), जान्हवी प्रदीप घरत (8),अशोक बळराम पाटील (48),योगिता महेश आगरकर वय (45), निशा सदनंद पाटील वय 55,त्रनिद विनोद नाईक वय 15 अशी आहेत. हा अपघात महार्गावरून तुरळ ते कडवई येथे जाण्यासाठी असलेल्या डायव्हर्शनच्या ठिकाणी झाला. त्यामुळे दोन्ही बाजूला सुमारे दहा ते बारा कि. मी. पर्यंत वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.