

रत्नागिरी : केंद्र सरकारने जुन्या वाहनमालकांना दिलासा दिला असून दुचाकी, चारचाकी गाडीची वयोमर्यादा 15 ऐवजी 20 वर्षे केली आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील नियमांमध्ये बदल करून जुन्या वाहनांचे वय वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या दुचाकी, चारचाकी मालकांना दिलासा मिळाला आहे.
15 वर्षांऐवजी 20 वर्षे मर्यादा केली असली, तरी यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार आहे. याचा अर्थ जुने वाहन आता आणखी पाच वर्षे चालवता येणार आहे. केंद्र सरकारचा हा आदेश दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त संपूर्ण देशभरात लागू केला जाणार आहे.केंद्रीय मोटार वाहन नियम 2025 अंतर्गत नियमात सरकारने बदल केला आहे. तुमचे 20 वर्षांपेक्षा जुने वाहन रस्त्यावर ठेवणे आता अधिक खर्चिक होईल आणि वाढीव शुल्काचा उद्देश जुन्या वाहनांच्या वापराला परावृत्त करणे आणि पर्यावरणासाठी अधिक फायदेशीर असलेल्या नवीन, कमी प्रदूषण करणार्या वाहनांना प्रोत्साहन देणे हा आहे. असे असले तरी वाहनधारकांकडून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.