

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 0 ते 100 हेक्टर लघु पाटबंधारे योजनांच्या जिल्ह्यातील 19 कामांचा आराखडा बनविला आहे. त्यासाठी सुमारे 5 कोटी 26 लाख 22 हजारांचा निधी आवश्यक आहे. त्यापैकी 3 कोटी 17 लाख 54 हजारांचा निधी प्राप्त झाला असून अजूनही अद्याप दोन कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.
या आराखड्यात संगमेश्वर तालुक्यातील 6, लांजा 2, रत्नागिरी 6, दापोली 2, चिपळूणमधील 1 व गुहागर तालुक्यातील 2 कामांचा समावेश आहे. 2024-25 साठी या कामांचा प्रारुप आराखडा बनवला आहे. त्यात सर्वाधिक बंधार्यांची कामे रत्नागिरी व संगमेश्वर या दोन तालुक्यातील आहेत. या योजनेतील कामांच्या 2023-24 या वर्षासाठी 198.50 व 2024-25 या वर्षात 317.54 लाखांचा निधी प्राप्त झालेला आहे. आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील गोळप मानेवाडी-कातळवाडी नळपाणी योजनेच्या विहिरीजवळ नदीला बंधारा बांधण्याच्या कामावर 29.13 लाख, कसोप बनवाडी येथील बंधार्यावर 18 लाख, कांगवई पेडणेकरवाडीतील बंधारा कामावर 14.91 लाख, देहेण देपोलकरवाडी बंधार्यावर 14.96 लाख असा एकूण 77 लाखांचा निधी खर्च पडला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरूख न.प.पु. योजना विहिरीजवळ बंधारा बांधणे कामासाठी 14 लाख अंदाजित रक्कम असून त्यापैकी 9 लाख प्राप्त झाला आहे. देवळे बाजारपेठ मुख्य वहाळ बंधारा कामासाठी 19 लाख रक्कम असून 12 लाख प्राप्त झालेले आहेत. मोर्डे बंदर पर्या बंधारा काम 19 लाख असून आतापर्यंत 12 लाखांचा निधी प्राप्त झालेला आहे. कनकाडी शिंदेवाडी ब्राम्हणवाडी सार्वजनिक विहिरीजवळ बंधारा बांधणे काम 19 लाखांचा असून या कामासाठीही 12 लाख निधी प्राप्त झालेला आहे. कनकाडी बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीजवळ बंधारा कामासाठी 19 लाख प्राप्त झाले आहेत. कासारकोळवण कांडकरी मंदिर येथे पोस्ता पर्या बंधारा काम 15 लाखांचे असून 9 लाख आतापर्यंत प्राप्त झाले.लांजा तालुक्यातील निओशी गणेश विसर्जनाजवळ काँक्रीट बंधारा काम 20 लाखांपैकी 12.10 लाख प्राप्त झालेले आहेत. पन्हाळे आदिष्टी मंदिर बंधारा बांधणे काम 24 लाखांपैकी कामासाठी आतापर्यंत 14.17 लाख प्राप्त झालेले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी मधलीवाडी व खालचीवाडी नदीवर बंधारा काम सुमारे 46 लाख 95 हजाराचे काम असून आतापर्यंत 28.17 लाख, पानवल सुरंगा पर्या येथे बंधारा काम सुमारे 49 लाख 99 हजार असून आतापर्यंत 30 लाख, फणसोप जुवीवाडी धरणाजवळ वहाळावरती बंधारा काम सुमारे 29 लाख 99 हजाराचें असून आतापर्यंत 19.79 लाख, गोळप मानेवाडी/कातळवाडी न.पा.पु. योजना विहिरीजवळ नदीवर बंधारा काम सुमारे 48 लाख 54 हजाराचें असून आतापर्यंत या कामासाठी 29.13 लाख, कसोप बनवाडी येथे नवीन बंधारा बांधणे काम सुमारे 29 लाख असून आतापर्यंत 18 लाखांचा निधी प्राप्त आहे. धामणसे शिरखोल येथे नदीवर वळण बंधारा व चारपाट बांधणे काम सुमारे 50 लाखाचे असून 30.02 लाख प्राप्त आहेत.