
रत्नागिरी/लांजा : रेल्वे मार्गावर पडलेले दगड हटवल्याने कोकण रेल्वेची दीडतास विलवडे जवळ थांबलेली वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. रेल्वे मार्गावर दगड पडल्याने विलवडेजवळ वाहतूक थांबलेली होती. हे दगड हटवल्याने थांबलेल्या रेल्वे मार्गस्थ झाल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.
दरम्यान, लांजा तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाने कोकण रेल्वे मार्गाला पाहिल्याच पवसात मोठा फटका बसला. मंगळवारी (दि. 20) सायंकाळी 5.30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील मांडवकरवाडी बोगद्याजवळ दरड कोसळली. ज्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.
कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने सुरफास्ट असणा-या शताब्दी व तेजस एक्सप्रेस विलवडे स्टेशन इथे अडकून पडल्या होत्या. दरड हटविण्याचे काम कोकण रेल्वे प्रशासनांकडून युद्धपातळीवर करण्यात आले.