रायगड जिल्ह्यात धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ | Raigad dam water level

रायगड जिल्ह्यात धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ | Raigad dam water level

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  यंदा पाऊस उशिरा झाल्याने सगळेच चिंतेत होते. जिल्ह्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठले होते. परंतु उशिरा का होईना जुलै महिन्यामध्ये पावसाने दमदार सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रात चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील सावित्रीनदी, अंबानदी, कुंडलिकानदी, पातळगंगा नदी, उल्हासनदी, गाढीनदी या महत्त्वाच्या नद्या भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणीसाठा वाढला आहे.

रायगड जिल्ह्यातील २८ धरणांपैकी १८ धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे. जिल्ह्यातील अद्याप दहा धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये सर्वात कमी श्रीवर्धन तालुक्यातील राणीवली धरण क्षेत्रात २२ टक्के पाणीसाठा झाला आहे. अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरण क्षेत्रात ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरित आठ धरणांमध्ये साठ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. असाच पाऊस पडल्यास लवकरच ही धरणे पूर्ण क्षमतेने भरतील.

रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत येत असलेल्या २८ धरणांमध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध,तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध,रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध,पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरण क्षेत्रात ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, घोटवडे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, ढोकशेत धरण क्षेत्रात ९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध, कवेळे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, उन्हेरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध,कुडकी धरण क्षेत्रात ८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध, रानीवली धरण क्षेत्रात २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, संदेरी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध,महाड तालुक्यातील वरंध धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध,खिंडवाडी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कोथुर्डे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध,खैरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरण क्षेत्रात ६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध,अवसरे धरण क्षेत्रात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, कलोते मोकाशी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध,डोणवत धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध, बामणोली धरण क्षेत्रात ८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, उसरण धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध,उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news