देवगड : साखरीनाटेतील नौका पकडली; पर्ससीन मच्छीमारी बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई

देवगड : साखरीनाटेतील नौका पकडली; पर्ससीन मच्छीमारी बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई

देवगड; पुढारी वृत्तसेवा : पर्ससीन मच्छीमारीस बंदी असतानाही बंदी आदेशाचा भंग करून पर्ससीन मच्छीमारी करणार्‍या राजापूर-साखरीनाटे येथील मिनी पर्ससीन नौकेला मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीपथकाने विजयदुर्ग समुद्रात साडेआठ वावामध्ये पकडले. ही कारवाई 18 मार्च रोजी सकाळी 10.50 ते 11.50 वा. च्या सुमारास केली.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या शीतल गस्तीनौकेद्वारे शनिवार 18 मार्च रोजी सकाळी मत्स्य व्यवसाय विभागाची टीम समुद्रात गस्त घालत असताना विजयदुर्ग समुद्रात साडेआठ वावात एक मिनी पर्ससीन नौका पर्ससीन मच्छीमारी करताना पकडली. ही नौका साखरीनाटे येथील अमिना इलियास मौसा यांच्या मालकीची असून पर्ससीन मासेमारी परवाना नसताना, नौका नोंदणी नसताना, नौकेवर नाव नसताना या नौकेद्वारे पर्ससीन मच्छीमारी करताना मत्स्यव्यवसाय विभागाने पकडले.पर्ससीन मच्छीमारी बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी या नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली असून ही नौका पुढील कारवाईसाठी विजयदुर्ग बंदरात आणून ठेवली आहे.या नौकेवर 12 खलाशी आहेत.ही कारवाई मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, पो.कॉ.नीलेश पाटील, सागर सुरक्षा रक्षक धाकोजी खवळे, संतोष ठुकरूल, हरेश्वर खवळे, अमित बांदकर, योगेश फाटक, सुंदर घारकर यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news