रत्नागिरी: दापोली उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती मातेचा मृत्यू

दापोली उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती मातेचा आज मृत्यू झाला.
दापोली उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती मातेचा आज मृत्यू झाला.

दापोली, पुढारी वृत्तसेवा : दापोली येथील उप जिल्हा रुग्णालयात गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १४) दुपारी घडली. सायली सनी नांगे (वय २७) असे मृत गर्भवती महिलेचे नाव आहे.

सुकीवली खेड कीववाडी येथे सासर असलेली सायली ही दापोली येथे माहेरी राहत होती. आज सकाळी अचानक तिला दम लागण्यास सुरवात झाली. यावेळी पती सनी आणि अन्य नातेवाईक यांनी तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या वेळी उप जिल्हा रुग्णालयात अन्य सुविधा नसल्याने तिला खासगी रुग्णालयात देखील उपचरासाठी नेण्यात आले होते.

सायली हिचा श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाला, असे उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक पवन सावंत यांनी सांगितले. सायली हिला तीन वर्षांची एक मुलगी आहे. सायली ही दोन दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. दरम्यान, आज उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news