भास्कर जाधव आमचे मार्गदर्शक : खासदार सुनील तटकरे | पुढारी

भास्कर जाधव आमचे मार्गदर्शक : खासदार सुनील तटकरे

दापोली; पुढारी वृत्तसेवा : कुणबी समाजाची मातृसंस्था असलेल्या कुणबी समाजोन्नती संघासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेला पाच कोटी रुपयांचा निधी हा कोणाचा पक्षप्रवेश व्हावा, या आमिषापोटी दिलेला नसून राज्य शासनाचे या समाजासाठी असा निधी देणे, हे कर्तव्यच होते. त्यामुळे पक्षप्रवेश हे होतच असतात. भास्कर जाधव हे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचा सल्ला आम्ही घेत राऊ. मात्र आमचे मार्गदर्शक आ. भास्कर जाधव यांनी कुणबी समाजाला दिलेल्या निधी बाबत केलेले विधान हे दुर्दैवी असून कुणबी समाजाचा अपमान करणारे आहे, असे मत खा. सुनील तटकरे यांनी दापोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.

काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांनी पाच कोटीचे आमिष दाखवून तटकरे यांनी कुणबी समाजातील नेत्यांना आपल्याकडे वळवल्याचे विधान केले होते. या बाबत तटकरे म्हणाले, प्रत्येक पक्षप्रवेश हे आमिष दाखवून केले जाते, अशी भूमिका शिवसेनेतून राष्ट्रवादी व राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांनी मांडणे, हे हास्यास्पद आहे. रायगड-रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा कुणबी समाजाला द्यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली असता शिवसेनेने यापूर्वी या मतदारसंघा बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली होती.

भास्कर जाधव देखील या मतदारसंघातून आमदार झाले होते. उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी व महाविकास आघाडीचे नेते घेतील. भास्कर जाधव यांचा सल्ला मात्र आम्ही वेळोवेळी घेऊ, अशी खोचक टीका त्यांनी केली. या टीकेचा आ. जाधव यांनी समाचार घेतला.

Back to top button