रत्नागिरी: अत्याचारप्रकरणी भौजाळी येथील आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी | पुढारी

रत्नागिरी: अत्याचारप्रकरणी भौजाळी येथील आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी

खेड; पुढारी वृत्तसेवा: चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस खेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी २० वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा आज (दि.२२) ठोठावली. सुरेश नारायण कुंबेटे उर्फ चकण्या बाबू (रा. भौजाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

दापोली तालुक्यातील मौजे भौजाळी येथे १६ जुलै २०२० रोजी आरोपी सुरेश याने पीडित अल्पवयीन बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःचे घरी घेवून गेला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या विरोधात खेड न्यायालयात खटला सुरू होता. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासून परिस्थितीजन्य पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात आले.

सरकारी वकील अॅड. मृणाल जाडकर यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार कृष्णा भोये, दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमती करंजकर, आडकूर, कोर्ट पैरवी सुदर्शन गायकवाड यांनी काम पाहिले.

हेही वाचा 

Back to top button