सिंधुदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : प्रकृती अस्वस्थतेमुळे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा मनिपाल येथे हलविण्यात आले आहे. Sindhudurg
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स अटेंड केली. त्यानंतर त्यांन अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर डॉ. शाम पाटील, डॉ आकरेकर व इतर डॉक्टरांनी उपचार केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा येथील मनिपाल येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचा