

'दिल्लीकरांना चांगलं वाटल पाहिजे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याने एकवेळ नारायण राणे यांना आणि दोनवेळा त्यांच्या मुलाला निवडणुकीत पराभूत करून केले आहे. आता हिम्मत असेल तर नारायण राणेंनी पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांच्या समोर कुडाळ मधून विधानसभा निवडणुक लढवुन दाखवावी, त्यांचे डिपॉझिट जप्त करून नाही दाखविले तर आम्ही नाव सांगणार नाही.' असे खुले आव्हान खा. विनायक राऊत यांनी ना. राणे यांना दिले.
केंद्रात मंत्री झाल्यानंतर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ज्या पध्दतीने विरोध करता, केवळ तुम्ही जिल्ह्याला भक्कास करण्याचे स्वप्न बघून काम करत असाल तर आम्ही सुध्दा मेलेल्या आईचे दुध पिलेले नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत हे लक्षात ठेवा असा घणाघातही यावेळी खा. राऊत यांनी केला.
हेही वाचा :
काँग्रेसचे जेष्ठ नेते कै. आबा मुंज यांच्या घावनळे येथील बालेकिल्यात शिवसेनेने सोमवारी सायंकाळी बामणादेवी येथे जाहीर मेळावा घेत घावनळे ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश वारंग यांच्यासह पंचक्रोशीतील 60 ते 70 कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देवुन शिवबंधन बांधले. यावेळी पंचक्रोशीच्या वतीने खा. विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, आ. वैभव नाईक यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर आ. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते,संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, महिला आघाडी प्रमुख सौ. जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, गटनेते नागेंद्र परब, तालुका संघटक बबन बोभाटे,जि.प.सदस्य अनुप्रिती खोचरे,अमरसेन सावंत,राजु कविटकर,श्रेया परब,मथुरा राऊळ,विकास कुडाळकर, बबन शिंदे,राजु शेटये,अतुल बंगे,रुपेश पावसकर, सौ.स्नेहा दळवी,रमाकांत ताम्हाणेकर यांच्यासह प्रभाकर वारंग,शाखाप्रमुख संतोष नागवेकर,कुष्णा धुरी,आरती वारंग,राम तावडे,रामा धुरी,कानु शेळके,सुधीर राऊळ,योगेश घावनळकर,जेष्ठ शिवसोनिक जयवंत वारंग, सानिका डिगे आदि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.