रत्नागिरी : दापोली-आंजर्ले मार्गावर अपघात; पाच जण ठार

रत्नागिरी : दापोली-आंजर्ले मार्गावर अपघात; पाच जण ठार

दापोली; पुढारी वृतसेवा : दापोली तालुक्यातील दापोली-आंजर्ले मार्गावरील आसूद जोशी आळी येथे ट्रेलर व मॅक्झिमो अपघात झाला आहे. आज (दि २५) दुपारी ही दुर्घटना घटना घडली. या अपघातात लहान मुलांसह ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच अन्य ११ जण जखमी असल्याची माहिती आहे. दापोलीकडून आंजर्लेकडे मॅक्झिमो वडाप जात असताना असुदजवळ, आसूद कडून दापोलीकडे येत असलेल्या ट्रेलरने मॅक्झिमो वडापला धडक दिली.  प्रवासी होते असा अंदाज आहे.

या अपघातात चालक अनिल सारंग, (वय 45), संदेश कदम (वय 55), स्वरा संदेश कदम (वय 08), मरियम काझी (वय 64), फराह काझी (वय 27) या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सपना संदेश कदम (वय 34) श्रद्धा संदेश कदम (वय 14) सर्व राहणार अडखळ , विनायक आशा चौगुले (रा. पाजपंढरी), मीरा महेश बोरकर (वय 22 ( रा. पाडले ) या चार जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित भूमी सावंत (वय 17), मुग्धा सावंत (वय 1 रा हर्णे) वंदना चौगुले (वय 34), ज्योती चौगुले (वय 09), विनोद चौगुले (वय 30 रा. पाजपंढरी) आदींवर दापोलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींना दापोली उप जिल्हा रुग्णालयात  दाखल केले असून काही दापोलीत खाजगी रुग्णालय तर काही जखमींना डेरवण येथे हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी दापोली उप जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. या अपघातात मदतीसाठी अनेक जण धावले .

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news