सिंधुदुर्ग: आंबोली परिसरात मुसळधार पावसाची हजेरी | पुढारी

सिंधुदुर्ग: आंबोली परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

आंबोली: पुढारी वृत्तसेवा: आंबोली परिसरात आज (दि.३०) दुपारी ३ च्या सुमारास वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा लखलखाटासह मुसळधार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वत्र गारवा पसरला. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

आज दुपारी आंबोली परिसरात ढगाळ वातावरण होते. अन् मेघगर्जनेसह विजांचा लखलखाट तसेच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस सुमारे दीड तास कोसळला. त्यामुळे हवेत गारवा पसरला. दरम्यान, मॉन्सूनला सुरूवात होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मॉन्सूनपूर्व शेतीच्या कामांना गती येणार आहे.

आंबोली परिसरात यंदा हिरण्यकेशी नदीचे पात्र ठिकठिकाणी कोरडे पडले आहे. तसेच इतरही नैसर्गिक पाणवठे पूर्णत: कोरडे पडले आहे. येथे जैवविविधतेने परिपूर्ण जंगल परिसर असूनही पाण्याची टंचाईग्रस्त स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे जंगली प्राणी आणि पक्षी यांना इतरस्त्र भटकावे लागत आहे. आज मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे जंगलातील पाणवठ्यात पाणी साठण्यास मदत झाली आहे.
दरम्यान, आंबोली येथे पावसाची सरासरी ३५० ते ४०० इंच किंवा त्याहून अधिक असते. येथे दरवर्षी १ जून ते ३१ ऑक्टोबर कालावधीत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी सदृश्य पाऊस नेहमी कोसळतो. तर वर्षभरात अधून – मधून काही प्रमाणात पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे येथील वातावरण नेहमी सर्वच ऋतूत आल्हादायक असते.

हेही वाचा 

सिंधुदुर्ग येथे बीएसएनएल टॉवरला आग

सिंधुदुर्ग : टस्करचा मोर्चा पुन्हा आंबोलीकडे!

सिंधुदुर्ग : अनैतिक संबधातून पत्नीचा खून; दोघांना अटक

Back to top button