Sindhudurg Gowal: गोवळ गावातील पुरातन विहिरी संवर्धनाच्या प्रतीक्षेत | पुढारी

Sindhudurg Gowal: गोवळ गावातील पुरातन विहिरी संवर्धनाच्या प्रतीक्षेत

सिंधुदुर्ग (देवगड): पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्हयाला (Sindhudurg Gowal)  ऐतिहासिक परंपरा असल्याने अनेक पुरातन ठिकाणे जिल्ह्यातील विविध भागात आढळतात. यातील एक ठिकाण म्हणजे देवगड तालुक्यातील गोवळ गाव. येथे सडयावर ३६० कातळात कोरलेल्या विहिरी आहेत. तसेच पांडवांचा वाडा, माठे वाघबीळ, घोडेबाव अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या विहिरी पुरातन काळातील असून या ठिकाणी जाण्यासाठी पायावाट आहे. या ठिकाणाचा पर्यटनात्मक विकास केल्यास या विहिरीच्या संवर्धनासह ऐतिहासिक ठेवा जपण्यास मदत होईल.

देवगड तालुक्यातील (Sindhudurg Gowal)  गोवळ गाव पुरातन मंदिराबरोबर हापूस आंब्यासाठी प्रसिध्द आहे. मुंबई – गोवा महामार्गावरून तळेरे- विजयदुर्ग राज्य मार्गावरील कासार्डे तिठ्ठा येथून २० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या विहिरी गावापासून किमान ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी पायवाटेने जावे लागते. या मार्गावरच कोरीव काम केलेली पंचवीस फूट लांबीची गुहा आहे. यापुढे जाताना वाटेत ५० ते ६० फूट लांब वाघबीळ असून ते ३ ते ४ फूट उंचीचे आहे. त्यातून जाताना झोपून जावे लागते. या ठाकाणी देवाचे ठिकाण असल्याने चप्पल बाहेर काढूनच आतमध्ये प्रवेश करावा लागतो. या ठिकाणी सर्वेक्षण झाल्यास नक्कीच काही तरी विशेष माहिती समोर येऊ शकते.

या गावचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या गावात ३६० कातळात विहिरी खोदण्यात आल्या आहेत. यातील एका विहिरीचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये म्हणजे घोडी खाली उतरुन पाणी पिऊ शकत होते. १८ फूट रुंद व ६० फूट लांब असलेल्या या विहिरीत पायऱ्या आहेत. त्यामुळे घोडा सहज पाणी पिण्यासाठी उतरु शकत होता. याठिकाणी घोडयांची पावलांच्या खुणा दिसून येतात. त्यामुळे या विहिरीला घोडेबाव असे संबोधले जाते.

तर काही विहिरी कातळात चौकोनी आकाराच्या कोरण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील एकमेव गोवळ गावात विहिरी दिसून येतात. याची सातबारावर नोंद आहे. सध्यस्थितीत या विहिरी कोटरी झुटपे, गवत व झाडात लपल्या आहेत. या विहिरींची स्वच्छता आणि संवर्धन केल्यास एक ऐतिहासिक ठेवा समोर येणार आहे. त्यासाठी पुरातन विभागाने इतिहास संशोधकांच्या मदतीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हेही वाचा       

Back to top button