Thiba Palace : सिंधुदुर्गातील थिबा पॅलेस अन् त्‍याचे ऐतिहासिक महत्‍व.. | पुढारी

Thiba Palace : सिंधुदुर्गातील थिबा पॅलेस अन् त्‍याचे ऐतिहासिक महत्‍व..

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा रत्नागिरी येथील थिबा पॅलेस सर्वाना पराचित आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोटन या गावात बांधलेला पहिला थिबा पॅलेसही आपल्याला आजही पाहावयास मिळतो. या ऐतिहासिक वास्तूचे आजही जतन केले जात असून, दुमजली पारंपरिक लाकडी व दगडी बांधकाम असणारा थिबा पॅलेस सर्वांचे लक्ष वेधून घेतो. सिंधुदुर्गातही थिबा पॅलेस मध्ये म्यानमार (ब्रम्हदेश) येथील थिबा राजाचे काहीकळ सिंधुदुर्गात वास्तव्य होते, हे यावरून दिसून येत आहे. प्रसिद्धी पासून लांब असलेल्‍या थिबा राजाच्या आणि राजवाड्याच्या अनेक आठवणी आजही सांगितल्या जातात.

याबाबत अधिक माहिती अशी की, आत्ताचा म्यानमार म्हणजेच तेव्हाचा ब्रम्हदेश येथे थिबा नावाचा राजा होता. अगदी वयाच्या १९ व्या वर्षी थिबा सिंहासनावर आरूढ झाला. यानंतर ब्रिटीशांनी मॅनमार (ब्रम्हदेश) मधून त्याला कैद करून आणल्यावर त्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड वाघोटन या ठिकाणी नजरकैदेत ठेवले होते.

या ठिकाणी पूर्वी घोडा तबेला, तुरूंग तसेच राजवाड्याचे स्वरूप देखणे होते. ही वास्तू थीबा राजासाठी बांधण्यात आली होती. काहीकाळ त्याचे या ठिकाणी वास्तव्यही होते. संपूर्ण लाकडी बांधकाम असून, हा राजवाडा दुमजली असून, या निसर्गरम्य परिसरातून विजयदुर्ग किल्ल्याचेही दर्शन होते. मात्र थिबा राजाला या ठिकाणी ठेवल्यानंतर येथे त्याची राहण्याची इच्छा नव्हती. यामुळे या ठिकणी रस्‍ता नसल्याने त्याला समुद्रामार्गे रत्‍नागिरीत आणण्यात आले. या घटनेला २५० वर्षे होऊन गेली आहेत असे स्थानिकांकडून सांगण्यात येते.

थिबा पॅलेस

थिबा हा तेंव्हाच्या भारतातील ब्राम्हदेशाचा शेवटचा राजा होता. म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रह्मदेशाचा तो राजा होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर २९ नोव्हेंबर १८८५ रोजी तो ब्रिटिशांना शरण गेला. स्वकियांपासून पूर्णपणे अलग पाडण्यासाठी ब्रिटिशांनी त्याची थेट नतंर भारतात रत्‍नागिरीला रवानगी केली. १६ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजा आपल्या कुटुंब कबिल्यासह रत्‍नागिरीत आला. रत्‍नागिरीत आल्यानंतर थिबाला राजवाडा बांधून देण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. १९१६ च्या डिसेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि थिबाची राजेशाही संपली.

आज रत्नागिरीतील थिबा पॅलेस पर्यटनासाठी महत्वाचे ऐतिहासिक स्थळ ठरत आहे. तर सिंधुदुर्ग वाघोटन थिबा पॅलेस सध्या लिलावात खासगी मालकाच्या ताब्यात आहे. देवगड मधील वाघोटन येथे थिबा राजाचे सिंधुदुर्गात वास्तव्य होते हे कमीच लोकांना माहित असून, असा राजवाडा या ठिकाणी आहे हे संदीप साळुंखे यानी प्रकाशझोतात आणले आहे.

हेही वाचा :  

Back to top button