सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात नववर्षाच्या शोभायात्रा; पारंपारिक वेशभूषेसह विविध देखावे | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात नववर्षाच्या शोभायात्रा; पारंपारिक वेशभूषेसह विविध देखावे

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यात नववर्षाच्या शोभायात्रा निघाल्या. यामध्ये कणकवली तालुक्यातील कासार्डे, तळेरे, ओझरम, दारूम पंचक्रोशी मिळून संयुक्त नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी या शोभायात्रेचे पहिलेच वर्ष असून यानिमित्त कासार्डे तिठा येथून नववर्ष स्वागत शोभायात्रा निघून तळेरे एसटी स्टॅन्ड पर्यंत जाऊन तेथील चौकात नववर्ष जल्लोष कार्यक्रम होत तिथून पुन्हा कासार्डे तिठयावर ही शोभायात्रा काढण्यात आली.

या शोभायात्रेत सर्वात पुढे भगवा धर्म ध्वज नेतृत्वकरीत सोबतीलालेझीम पथक,लहान मुले, चित्ररथ देखावे, वारकरी भजन,तरुण मुली,वारकरी भजन,महिला, ढोल पथक, पुरुष, चित्ररथ देखावा, वारकरी भजन, कार्यकारी मंडळ, बैलगाडीवर देखावा, ट्रॅक्टरवर देखावा असे भव्यदिव्य शोभायात्रा निघत या दरम्यान

पुरुषांनी पारंपारिक वेशभूषा व महिलांनी नऊवारी साड्या पोषाख परिधान करून सहभागी होत ही शोभायात्रा कासार्डे, तळेरे,ओझरम, दारूम व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उस्फुर्तपणे सहभागी झाले.

Back to top button