रायगड : रोहा तालुक्यात जोरदार पाऊस; आंबा, काजु बागायतदार हवालदिल

रोहे; पुढारी वृत्तसेवा : रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळपासुन ढगाळ वातावरण असताना शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळी १० वाजल्यापासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.
सकाळपासुन पावसाची चाहुल लागली असताना १० च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरीकांची तारांबळ उडाली.आलेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.गारवारा सकाळपासूनच रोह्यात जाणवत होते. मार्च महीन्यात या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे आंबा व काजु बागायतदार हवालदिल झाला असताना मंगळवारी आलेल्या पावसामुळे शेतकरी पुरते धास्तावला आहे.आधीच झालेले नुकसान पहात उरले सुरले आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मोठ्या कष्टाने करीत असलेल्या वीट व्यावसायिक या वर्षी पावसामुळे पुरता अडचणीत आला आहे.मार्च महीन्याच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे कसे तरी वीट भट्टी वाचविण्यात यश आले होते.प्लास्टीक पार्टी झाकले होते.परंतु मंगळवरी आलेल्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायीक अडचणीत सापडला आहे.