रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही; डॉ. फुले | पुढारी

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही; डॉ. फुले

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : ओमिक्रॉन व्हेरियंटच्या एक्सबीबी विषाणूचे रुग्ण आता महाराष्ट्रातही आढळले असून आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीदेखील खबरदारी म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर दिल्ली किंवा पुण्यात हे नमुने तपासणीसाठी पाठवणार आहोत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.

पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या नवीन उपप्रकारांमधील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात 70 हून अधिक एक्सबीबी रुग्णांची नोंद झाली आहे. शिमग्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा आहे. यातील 4 रुग्ण हे मुंबईस्थित असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.

Back to top button