रत्नागिरी : मंडणगडच्या १३ पैकी ६ ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना सत्तेत! | पुढारी

रत्नागिरी : मंडणगडच्या १३ पैकी ६ ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना सत्तेत!

मंडणगड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्य निवडीकरिता १८ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकांची मतमोजणी आज भिंगळोली येथील तहसिल कार्यालयात करण्यात आली. आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून (शिंदे गट) ही निवडणूक लढवण्यात आली. त्यांच्याविरोधात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय या तीन पक्षांची महाविकास आघाडी उभी होती. १३ पैकी कुंबळे, पिंपळोली, तिडे-तळेघर, वेसवी, देव्हारे व शिगवण या ग्रामपंचयतीचे थेट सरपंच निवडून आणत शिंदे गटाने निवडणुक निकालात आघाडी घेतली. तर महाविकास आघाडीने दहागाव, अडखळ, लोकरवण, बाणकोट, विन्हे, दुधेरे – बामणघर या ६ ग्रामपंचायतींचे थेट सरपंच निवडून आणत जोरदार लढत दिली. मुरादपुर ग्रामपंचायत गाव पँनेल म्हणून निवडून आली.

निवड़णुक आयोगाने घोषित केलेल्या १४ ग्रामपंचायतीपैकी सडे या ग्रामपंचयतीचे सरपंच व सदस्यांची गाव पँनेल म्हणून या पुर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. दुरंगी लढतीत तालुक्यातील भाजपा मनसे या पक्षांनी जागोजागी शिंदे गटास मदत केल्याने या दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत सदस्य बनून लोकांचे नेतृत्व करण्याची संधीही मिळवली. तेरा ग्रामपंचायतीसाठी तालुक्यात ६५.८५ टक्के मतदान झाले. यात १०४२२ मतदारांनी मतदानाच हक्का बजावला होता. याच ग्रामपंचायतींमध्ये २०१७ साली ७१.१३ टक्के इतके मतदान झाले होते व १०८७७ स्त्री व पुरुष मतदारांना मतदानांचा हक्क बजाविला होता. मागील वेळेपेक्षा सुमारे ५ टक्के इतकी मतदानाची टक्केवारी खाली आलेली दिसून आली.

हेही वाचलंत का?

Back to top button