Sindhudurg District Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून नावे निश्चित - पुढारी

Sindhudurg District Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून नावे निश्चित

सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank) अध्यक्षपदासाठी भाजपकडून मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तर आघाडीच्यावतीने अध्यक्ष पदासाठी व्हिक्टर डांट्स तर उपाध्यक्ष पदासाठी सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे.

Sindhudurg District Bank : नारायण राणेंची सत्ता

दरम्यान, जिल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सत्ता आली आहे. या बँकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. लक्षवेधी ठरलेल्या जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सिध्दिविनायक सहकार पॅनेलने ११ जागावर विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. तर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सहकार वैभव पॅनलला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतिश सावंत व भाजप पॅनलचे प्रमुख राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत १९ जागासाठी एकुण ३९ उमेदवार रिंगणात उतरले होते.

 

Back to top button