

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी दक्षिण सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवर चाकणकरांना लक्ष्य करून आक्षेपार्ह पोस्ट वारंवार शेअर केल्या जात होत्या. यानंतर महिला आयोगाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67A नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याआधारे सायबर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील येवले येथील आकाश दिगंबर दळवे (३०) आणि सांगोला तालुक्यातील पारे कोकरेवाडी येथील अविनाश बापू पुकळे (३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत दळवे याला मोहोळ येथून अटक केली, तर पुकळे याला पुणे येथून अटक केली.