

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज सोमवार (दि.१६) पासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विधानसभेत आज परभणी हिंसाचार, बीडमधील हत्येचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, संविधानाचा अपमान कोणीही सहन करणार नाही. योग्य उपाययोजना करु, असे उत्तर दिले. बीड जिल्ह्यातील हत्येच्या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी होईल. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी आज विधानपरिषदेत चर्चा झाली. बीडच्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सभागृहाला दिली.
मंत्रिपद मिळाले नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर भुजबळ यांनी स्वत: नाराज असल्याचे म्हटले आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं आणि फेकलं तरी काय फरक पडतो. मंत्रिपद किती वेळा आलं आणि गेलं छगन भुजबळ संपला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
परभणी, बीडमधील घटना धक्कादायक आहे. यावर सरकारने भूमिका मांडावी, अशी मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन्ही घटनांवर सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगितले. या घटना गंभीर आहेत. संविधानाचा अपमान कोणीही सहन करणार नाही. योग्य उपाययोजना करु. कायदा आणि सुव्यवस्था कशी राखता येईल ते पाहू, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात मंत्रिमंडळातील नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज सोमवार (दि.१६) पासून नागपूरमध्ये सुरू झाले आहे. आठवडाभराचे कामकाज ठरलेल्या अधिवेशनामध्ये यावेळी तारांकित प्रश्न, लक्षवेधी नाहीत. केवळ ठराव, राज्यपाल अभिभाषणावर चर्चा आणि पुरवणी मागण्यावर चर्चा होणार आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले, "...आम्ही आमच्या जाहीरनाम्यात म्हटले होते की महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा आणला पाहिजे. त्यासाठी आता आम्ही काम करू..."
'ईव्हीएम हटाव, देश बचाव'चे पोस्टर हातात घेऊन आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळ पायऱ्यावर आंदोलन केले.