कौल कुणाला? आज फैसला

Maharashtra assembly polls | दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट; कडेकोट बंदोबस्त
Maharashtra Assembly Polls |
कौल कुणाला? आज फैसलाFile Photo
Published on: 
Updated on: 

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सावंतवाडी, कुडाळ मतदारसंघासह कणकवली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. कणकवली मतदारसंघाची मतमोजणी कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात 14 टेबलवर 24 फेर्‍यांमध्ये, कुडाळची तहसील कार्यालयात 14 टेबलवर 20 फेर्‍यांमध्ये, तर सावंतवाडी मतदारसंघाची तहसील कार्यालयात 20 टेबलवर 23 फेर्‍यांमध्ये होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निकाल ऐकण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कोठे थांबायचे याची ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान यावेळच्या वाढत्या मतदानाचा कौल कुणाला मिळणार, हे आता अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

कणकवलीसाठी 116 अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती

कणकवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 6 टेबलवर टपाली, तर 14 टेबलवर ईव्हीएम मशिनची मतमोजणी होणार असून मोजणीच्या 24 फेर्‍या होणार आहेत. यासाठी तब्बल 116 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. मतदारसंघातील 332 केंद्रांवरील मतमोजणीसाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी व टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी व इतर 50कर्मचारी असे 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एका फेरीत 14 केंद्रांची मोजणी होणार आहे. अशा 24 फेर्‍यांमध्ये ही संपूर्ण मोजणी पार पडणार आहे.(Maharashtra assembly polls)

कुडाळात 20 फेर्‍यांमध्ये 279 केंद्रांची मतमोजणी

कुडाळ मतदारसंघातील मतमोजणीची सुरुवात मालवण तालुक्यापासून करण्यात येणार असून 14 टेबलांवर 20 फेर्‍यामध्ये सर्व 279 केंद्रांची मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी काऊंटिंग सुपरवायझर पुष्कराज सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी दिली. मतमोजणीकरिता काऊंटिंग स्टॉप, काऊंटिंग सुपरवायझर, काऊंटिंग असिस्टंट, मायक्रो ऑब्जर्वर असे प्रत्येक टेबलवर नियुक्त करण्यात आले आहेत.

ईव्हीएमची काऊंटिंग करण्यासाठी साधारणतः 14 टेबल निश्चित करण्यात आली आहेत. 20 फेर्‍यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. पोस्टल बॅलेट आणि ईटीपीबीएससाठी (सैनिक मतदार मतपत्रिका) एकूण 5 अधिक 1 अशी 6 टेबलांची रचना केली आहे. अशी 14 टेबल आणि पोस्टल बॅलेटची 6 टेबल मिळून 21 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.(Maharashtra assembly polls)

सावंतवाडीत 14 टेबलवर 22 फेर्‍यांमध्ये मतमोजणी

सावंतवाडी मतदारसंघाची मतमोजणी 14 टेबलवर 22 फेर्‍यांत होणार आहे. एका टेबलवर तीन कर्मचारी असे मिळून 42 कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात करण्यात आले आहेत. 22 फेर्‍यांतच पूर्ण निकाल सकाळी 11 पर्यंत जाहीर होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, प्रत्येक मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याद़ृष्टीने जादा पोलिस कुमक आणि एसआरपीच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news